‘पाकव्याप्त कश्मीरचा ताबा सोडा’; डॉ. काजल भट यांनी पाकिस्तानला खडसावलं

नवी दिल्ली | भारताने अनेकवेळा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानला सुनावले आहे. परंतु, कुरघोड्या करण्याची पाकिस्तानची सवय गेलेली नाही. त्यातच पुन्हा एकदा भारताकडून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानवर जोरदार ताशेरे ओढले आहे.

युएनमधील भारताच्या स्थायी सल्लागार डॉ. काजल भट यांनी काश्मिरचा मुद्दावर प्रत्युत्तर देत पाकिस्तानवर टीका केली आहे. तसेच पाकिस्तान युएनच्या व्यासपीठाचा वापर करत दुर्भावनापुर्ण प्रचार करत आहे, असं भारतीय प्रतिनिधींनी म्हटलं आहे.

यावेळी जम्मू-काश्मीरमधील सर्व क्षेत्रे त्वरित रिकामे करण्याचं आवाहन डॉ. काजल भट यांनी केलं आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जम्मू-काश्मिरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून त्यांनी इस्लामाबादवर जोरदार टीका केली आहे.

‘जम्मू-काश्मीर आणि लडाखचा संपुर्ण केंद्रशासित प्रदेश कायम भारताचा अविभाज्य भाग राहिलेला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानच्या बेकायदेशीरपणे ताब्यात असलेल्या भागांचा समावेश होतो. आम्ही पाकिस्तानला बेकायदेशीर पणे ताब्यात असलेल्या सर्व क्षेत्रे रिकामी करण्याचं आवाहन करतो’, असं डॉ. काजल यांनी म्हटलं आहे.

भारताकडून मंगळवारी संयुक्त राष्ट्रांना सांगण्यात आलं आहे की, पाकिस्तान पुरस्कृत सीमापार दहशतवादाच्या विरोधात निर्णायक आणि कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच डॉ. काजल भट यांनी म्हटले आहे की, कोणत्याही अर्थपुर्ण संवादाकरिता अनुकूल वातावरण निर्माण करणं ही पाकिस्तानची जबाबदारी आहे. जी केवळ दहशतवाद, हिंसा, शत्रुत्व यांपासून मुक्त वातावरणामध्ये चर्चा होऊ शकते.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या व्यासपीठाचा पाकिस्तानच्या प्रतिनिधीकडून भारताविरूद्ध चुकीचा प्रचार करण्यात येत असल्यामुळे डॉ. काजल भट पाकिस्तानला घाम फोडणार प्रत्युत्तर दिलं आहे.

पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी जगाचे लक्ष त्यांच्या देशाच्या दु:खद स्थितीवरून वळविण्याचा व्यर्थ प्रयत्न केला, असं डॉ. काजल म्हटलं आहे.

ज्या पाकिस्तानमध्ये विशेषत: अल्पसंख्यांक समुदायातील लोकांचे जीवन उलथुन टाकले जाते. पाकिस्तानला एक प्रस्थापित इतिहास आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणे, मदत करणे आणि सक्रीय पाठींबा देणे हे देखील सदस्य राष्ट्रांना माहिती आहे, असं म्हणतं डॉ. काजल भट यांनी पाकिस्तानला सुनावले आहे.

दहशतवाद्यांना प्रशिक्षण, पाठिंबा तसेच शस्त्र देणे हे पाकिस्तानचं काम आहे. तसेच दहशतवाद्यांना वित्तपुरवठा करणे ही या देशाच्या धोरणाची बाब आहे, अशी टीका डॉ. काजल भट यांनी पाकिस्तानवर केली आहे.

दरम्यान, अनेकवेळा पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. मात्र, भारतीय अधिकाऱ्याकडून सणसणीत प्रत्युत्तर देण्यात आल्यानंतर त्यांना ते ऐकत बसण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो.

महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसीमध्ये चालणार ‘दादा’गिरी! सौरव गांगुलीच्या खांद्यावर आली ‘ही’ मोठी जबाबदारी

 “सांगे कीर्ती बापाची, तो एक मुर्ख”; नाना पटोलेंवर खोचक टीका

 संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

इंधन दरवाढीचा परिणाम आता रिक्षावरही; केली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

  ‘पार्ट टाईम मुख्यमंत्री’; भाजपच्या या टीकेवर शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…