Top news मनोरंजन

सुशांत प्रकरणी अखेर मौन सोडत प्रसून जोशी यांनी दिली महत्वाची माहिती म्हणाले…

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी वळणं मिळाली आहेत. सुशांतच्या मृ.त्युप्रकरणी चालू झालेला शोध आज बॉलिवूड इंडस्ट्रीतील अं.मली पदार्थ प्रकारणापर्यंत येऊन पोहचला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सीबीआय टीम सुशांत प्रकरणी शोध घेत आहे. तसेच दिल्लीतील एम्स रुग्णालयाची मेडिकल टीम सुद्धा सुशांत प्रकरणातील सर्व फॉरेन्सिक रिपोर्टसची फेर तपासणी करत शोध लावण्याचा प्रयत्न करत होती.

एम्स रुग्णालयाच्या मेडिकल टीमनं सुशांत प्रकरणातील अंतिम अहवाल सीबीआयकडे सोपविला आहे. सुशांत सिंह राजपुतची ह.त्या झाली नाही यर सुशांतनं स्वतः आत्मह.त्या केली आहे, असा अहवाल एम्सच्या टीमनं दिला आहे. सुशांत सिंह राजपूतची ह.त्या झाली असावी, या शक्यतेला एम्सच्या टीमनं नकार दिला आहे.

एम्सच्या अहवालानुसार सुशांतनं आ.त्मह.त्या केली आहे, हे स्पष्ट झाल्यानंतर सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी सुशांत प्रकरणी मौन सोडलं आहे. कोणत्याही व्यक्तीच्या ह.त्येपेक्षा आत्मह.त्या ही जास्त चिंतेचा विषय आहे, असं म्हणत प्रसून जोशी यांनी सुशांत प्रकरणी आपलं मत व्यक्त केलं आहे.

ह.त्येपेक्षा आत्मह.त्या ही जास्त चिंतेचा विषय आहे. कारण ह.त्येच्या केसमध्ये मा.रेकऱ्यांना पकडून त्यांना शिक्षा दिली जाऊ शकते. मात्र, आत्मह.त्या ही एका आजाराप्रमाणे आहे, असं प्रसून जोशी यांनी म्हटलं आहे.

सुशांत प्रकरणावरून सर्वांनी एक गोष्ट लक्षत घेतली पाहिजे की काहीतरी असं घडतंय ज्यामुळे लोक सुरक्षित नाहीत. लोक अडचणींचा सामना करायला घाबरत आहेत. ही काय सामान्य गोष्ट नाही याला गंभीरतेनं घ्यायला हवं, असंही प्रसून जोशी यांनी सांगितलं आहे.

तसेच कोणत्याही कलाकारासाठी व्यापरापेक्षा त्याचं जीवन महत्वाचं असतं. एक कलाकार जीवनात केव्हाच पैशांना महत्व देणार नाही. कलाकारचे हृदय खूप मोठं असतं, असंही प्रसून जोशी यांनी म्हटलं आहे.

सुशांत सिंह राजपुतचा 14 जून रोजी त्याच्या वांद्रे येथील घरी मृ,तदेह आढळला होता. यानंतर मुंबई पोलीसांनी सुशांत प्रकरणी तपास सुरू केला होता. मात्र, सुशांतच्या कुटुंबाने बिहारमध्ये एफआयआर नोंदविल्यामुळे बिहार पोलिसांनीही याप्रकारणी शोध सुरू केला होता. यानंतर मुंबई आणि बिहार पोलिसांमध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलं होतं.

मुंबई आणि बिहार पोलिसांच्यातील वा.द सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं सुशांत प्रकरण सीबीआयकडे सोपविलं होतं. सुशांतनं आ.त्मह.त्या केली नसून सुशांतची ह.त्त्याच करण्यात आली होती, असा आ.रोप सुशांतच्या कुटुंबाने केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांतनं आत्मह.त्याच केली होती हे समोर आल्यानंतर सुशांतची बहिण म्हणतेय…

रतन टाटांच्या टाटा मोटर्सला भारतीयांची साथ, सप्टेंबरमध्ये तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी विक्रीत वाढ…!

उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक सामूहिक ब.लात्कार; भाजप नेत्याला ठोकल्या बेड्या!

बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का! वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीचं निधन

आयपीएलमध्ये धोनीनं केला ‘हा’ कारनामा; सुरेश रैनाला टाकलं मागे!