“दिल्ली काबीज करु, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करु”; उद्धव ठाकरे आक्रमक

मुंबई | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरातून त्यांना अभिवादन केलं जात आहे. राज्यभर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवरही हल्लाबोल केला.

गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नाहीये. त्यांच्यावर मानेची शस्त्रक्रिया झाल्यानं बऱ्याच दिवसांपासून ते घरीच आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा धरवला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दिल्लीत पुतळा उभारु. तसेच येत्या काळात दिल्ली काबीज करु, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांचं स्वप्न पूर्ण करु.

प्रत्येक वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. अशातच आज मुख्यमंत्र्यांनीही त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. कोरोनाच्या लाटेमागून लाटा येऊ शकतात. तर आपण शिवसेनेची लाट का आणू शकत नाही. आपल्याकडे वारसा आहे तो वारसा घेऊन दिल्लीमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारुच त्यासोबत दिल्ली काबीज करणार आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

मी सुद्धा शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे. तलावर जरी माझ्या हातात नसली तरी तलावर कशी गाजवायची हे माझ्या नसानसांत भिनलेलं आहे, असंही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत त्या काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचं तेज दाखवणार आहे. जसं काळजीवाहू सरकार असतं, तसे हे काळजीवाहू विरोधक आहेत. त्यांचा स्वतःच स्वतःच्या काळजीने अंत होणार आहे, असं म्हणत विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, खूप दिवसांनंतर उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. याचबरोबर त्यांच्या आक्रमकपणाही पहायला मिळाला. विरोधकांवर त्यांनी चांगलाच हल्लाबोल केला. विरोधकांच्या आरोपांवरही त्यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे आणि तलवार जरी हातात नसली तरी…”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

 निधनाच्या अफवांवर लता मंगेशकर यांनीच केलं ट्विट, म्हणाल्या…

  येत्या 2 दिवसात ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

  “…तर बाॅलिवूड चित्रपटांचं महत्त्व कमी होण्याची शक्यता”; अभिनेत्यानं व्यक्त केली भीती

 अभिनेत्री समंथानं डिलीट केली घटस्फोटाची पोस्ट, पुन्हा चर्चांना उधाण