“…मग बघू कोण सरस ठरत ते”; उद्धव ठाकरेंचं थेट अमित शहांना आव्हान

मुंबई | देशाचे गृहमंत्री अमित शहा काही दिवसांपूर्वी राज्याच्या दौऱ्यावर होते. पुण्यातील कार्यक्रमात बोलताना अमित शहांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली होती.

शिवसेना आणि भाजप यांची देशाच्या राजकारणातील सर्वात गाजलेली मैत्री आहे. सध्या तितकंच या दोन्ही पक्षांतील शत्रुत्व गाजत आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करत आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीदिनीच दोन्ही पक्षांत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जयंतीनिमीत्तानं आयोजित कार्यक्रमात भाजपवर जोरदार टीका केली आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सेना एकत्रित लढले पण त्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षामध्ये जोरदार वाद झाला. परिणामी राज्याच्या राजकारणात भाजपला पर्याय म्हणून महाविकास आघाडीचा उदय झाला.

शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा कसलाही शब्द दिला नसल्याचं शहा म्हणाले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या त्या भाषणावर जोरदार टीका केली आहे.

अमित शहा यांनी सर्व काहीबाजूला सोडून, तुमचे अधिकार बाजूला सोडून, तुम्ही तुमच्या अधिकाराविना आणि आम्ही आमच्या अधिकाराविना एकमेकांविरूद्ध लढू, असं आव्हान ठाकरेंनी शहांना दिलं आहे.

कार्येकर्ते कार्येकर्ते आणि पक्ष-पक्ष म्हणून लढा, मग बघू कोण सरस ठरत ते, असं आव्हान शहांना ठाकरेंनी दिलं आहे. आव्हान द्यायचं आणि ईडीची पिडा लावायची हे काही बरोबर नाही, असंही ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे मोठ्या कालावधीनंतर बोलत होते. काही काळापासून ते तब्येतीच्या कारणानं कार्यक्रमांना उपस्थित राहत नाहीत. पण खूप दिवसानंतर ठाकरे आपल्या खास ठाकरे शैलीत विरोधकांवर बरसले हे मात्र नक्की.

महत्त्वाच्या बातम्या –

 “मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे आणि तलवार जरी हातात नसली तरी…”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

 निधनाच्या अफवांवर लता मंगेशकर यांनीच केलं ट्विट, म्हणाल्या…

  येत्या 2 दिवसात ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

  “…तर बाॅलिवूड चित्रपटांचं महत्त्व कमी होण्याची शक्यता”; अभिनेत्यानं व्यक्त केली भीती

 अभिनेत्री समंथानं डिलीट केली घटस्फोटाची पोस्ट, पुन्हा चर्चांना उधाण