उ. प्रदेश सरकारची तिजोरी मालामाल; एका दिवसात तब्बल एवढ्या कोटींची मद्यविक्री

लखनऊ |  गेल्या अनेक दिवसांपासून भारतात देशव्यापी लॉकडाऊन सुरू आहे. 2 टप्प्यातल्या लॉकडाऊनची अतिशय कडक अंमलबजावणी केली गेली आहे. मात्र देशातल्या तिसऱ्या टप्प्यातल्या लॉकडाऊन काळात अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काही नियम शिथील करण्यात आले आहे. शिथील केलेल्या नियमांमध्ये झोननुसार दारूची दुकाने उघडी ठेवण्याला परवानगी देण्यात आलेली आहे. काल एका दिवसात उत्तर प्रदेशातल्या योगी सरकारची तिजोरी मद्यपींनी मालामाल करून टाकली आहे.

उत्तर प्रदेशात काल एकाच दिवशी तब्बल 26 हजार दारूच्या दुकांनामधून लोकांनी तब्बल 100 कोटींची दारू विकत घेतली. उत्तर प्रदेशात दरदिवशी 70 ते 80 कोटी रूपयांची दारूविक्री होत असते. मात्र काल जवळपास दीड महिन्यांनंतर दारूची दुकाने उघडल्याने मद्यपींनी दारूच्या दुकानात तुंबळ गर्दी केली होती.

लॉकडाउनमध्ये काल पहिल्यांदाच मद्यविक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर देशभरातील विविध शहरांमध्ये लोकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये देशातल्या अनेक शहरांमध्ये दारूच्या खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या.

दरम्यान, उत्तर प्रदेशात कोणत्याही मद्यविक्रीच्या दुकानाबाहेर लोकांनी गर्दी करू नये आणि ते सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतात की नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-विश्वास नांगरे पाटलांचे नाशकात वाईन शॉप बंद करण्याचे आदेश…

-मराठा क्रांती मोर्चाचा चेहरा शांतारामबापू कुंजीर यांचे निधन

-परीक्षांबाबत लवकरच निर्णय जाहीर करणार- मंत्री उदय सामंत

-तुकाराम मुंढेंनी शासनाचा आदेशही मानला नाही; दारुची दुकानं बंद म्हणजे बंदच!

-परप्रांतीय मजुरांची पोलिसांवर दगडफेक; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराचा वापर