मुंबई | मोदी सरकारच्या आर्थिक चुका दाखवण्यात काँग्रेस कमी पडली, अशी कबुली काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. ते ‘लोकसत्ता’च्या ‘वेब सेमिनार’ या विशेष कार्यक्रमात बोलत होते.
गेल्या काही वर्षांत मोदी सरकारने देशाचे आर्थिक धोरण बदलणारे मोठे निर्णय घेतले. पण नोटबंदी, जीएसटी अशा निर्णयांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले मात्र जनतेला पटवून देण्यात आम्हाला यश आलं नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
नोटाबंदी आणि जीएसटीसारखे मोठे निर्णय मोदी सरकारने कुणाचाही सल्ला न घेता घेतले असून त्याची किंमत देशाला आर्थिक स्तरावर मोजावी लागली असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. तसंच भाजप सरकारच्या अनेक योजनांचा समाचार घेणं काँग्रेसला जमलं नाही, असंही ते म्हणाले.
दुसरीकडे भाजपचे निर्णय आणि योजना कश्या खोट्या आहेत किंवा फोल आहेत हे संसदेत मुद्देसूदपणे मांडतं आलं असतं पण हे करण्यात काँग्रेस कमी पडली किंवा काँग्रेसला ते जमलं नाही, अशी कबुली चव्हाण यांनी यावेळी दिली.
महत्वाच्या बातम्या-
-उ. प्रदेश सरकारची तिजोरी मालामाल; एका दिवसात तब्बल एवढ्या कोटींची मद्यविक्री
-विश्वास नांगरे पाटलांचे नाशकात वाईन शॉप बंद करण्याचे आदेश…
-मराठा क्रांती मोर्चाचा चेहरा शांतारामबापू कुंजीर यांचे निधन
-परीक्षांबाबत लवकरच निर्णय जाहीर करणार- मंत्री उदय सामंत
-तुकाराम मुंढेंनी शासनाचा आदेशही मानला नाही; दारुची दुकानं बंद म्हणजे बंदच!