भिवंडीनंतर ‘या’ शहरात 30 जूनपर्यंत लॉकडाउन जाहीर

मुंबई | भिवंडीत 15 दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आला असताना आता अंबरनाथमध्येही संपूर्ण लॉकडानची घोषणा करण्यात आली आहे. अंबरनाथमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. यासंबंधी आदेश जारी करण्यात आला आहे.

उद्यापासून हा लॉकडाउन लागू होणार आहे. यादरम्यान शहरातील अत्यावश्यक सेवा वगळात इतर सर्व दुकानं बंद राहणार आहेत. अंबरनाथ नगरपरिषदेकडून यासंबंधी अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे.

कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी शहरातील गर्दी कमी करण्याच्या उद्धेशाने शहरातील सर्व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहेत. दूध, फळे, पालेभाज्या यांची घरपोच सेवा व दवाखाने सुरु असणार आहे.

23 जून ते 30 जून दरम्यान ही सर्व दुकानं बंद असणार असून नागरिकांनी गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावंर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-जुलैपासून एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल!

-सुशांत सिंग राजपूतच्या न्यायासाठी करणी सेना लढणार

-उद्याच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांचा मोठा निर्णय

-झेप घेण्यासाठी वाघही दोन पावले मागं येत असतो… रोहित पवारांचा तरूणांना कानमंत्र

-कोणत्याही परिस्थितीत तूर्त शाळा-कॉलेज उघडू नका, कपील पाटलांचं मुख्यमंत्री अन् शिक्षणमंत्र्यांना पत्र