कोरोनाविरोधातील लढ्यासाठी बीएमसीचा नवा अ‍ॅक्शन प्लॅन; ‘या’ सहा विभागांमध्ये राबवलं जाणार ‘मिशन झिरो’

मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाताना दिसतेय. त्यात मुंबईमध्येही रूग्णांची संख्या जास्त आहे. मुंबईतील ही वाढती संख्या कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘मिशन झिरो’ राबवण्यास सुरुवात केली आहे.

पहिल्यांदा मुंबईतील एकूण सहा विभागांमध्ये हे ‘मिशन झिरो’ राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये भांडुप, मुलुंड, बोरिवली, दहिसर, मालाड, कांदिवली या विभागांचा समावेश करण्यात आला आहे.

‘मिशन झिरो’ अंतर्गत दोन-तीन आठवड्यात रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. त्यानंतर या रूग्णांवरील उपचारांसाठी 50 फिरत्या दवाखान्यांची व्यवस्था करण्यात आहे. मुंबई पालिकेच्या ‘मिशन झिरो’या संकल्पनेमुळे वाढत्याकोरोना रुग्णांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे.

‘मिशन झिरो’ उपक्रमाचा शुभारंभ अंधेरीच्या शहाजीराजे क्रिडा संकुल या ठिकाणहून सुरु करण्यात आला. यामध्ये नेमून दिलेल्या परिसरात जाऊन रुग्णांची तपासणी करणार तसंच औषधं देऊन कोरोना संशयित रुग्णांना त्वरीत वेगळे करुन त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात येणार.

महत्वाच्या बातम्या-

-भिवंडीनंतर ‘या’ शहरात 30 जूनपर्यंत लॉकडाउन जाहीर

-जुलैपासून एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल!

-सुशांत सिंग राजपूतच्या न्यायासाठी करणी सेना लढणार

-उद्याच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांचा मोठा निर्णय

-झेप घेण्यासाठी वाघही दोन पावले मागं येत असतो… रोहित पवारांचा तरूणांना कानमंत्र