“मोदीजींना स्वतःबद्दल गैरसमज आहे त्यांना देश समजला नाही… त्यामुळे माफी मागून काहीही फरक पडणार नाही”

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर दुसऱ्यांदा जनतेला संबोधित करताना लॉकडाउनची घोषणा केली होती.

केंद्र सरकारनं देशातील नागरिकांना कोणतीही कल्पना न देता लॉकडाउनची घोषणा केल्यामुळे गोंधळ उडाला आहे, अशी टीका सुरू झाली. मोदींनी त्यानंतर पुन्हा एकदा जनतेला संबोधताना देशावीयांची माफी मागितली. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.

मोदीजींना स्वतःबद्दल गैरसमज आहेत आणि देश समजला नाही! आत्ममग्न व्यक्ती स्वतःला समजू शकत नाही आणि देश समजायला द्रवणारे हृदय लागते. त्यामुळे माफी मागून काहीही फरक पडणार नाही, अशी टीका सावंत यांनी केली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने देश लॉकडाउन करावा लागला. यासाठी मी देशवासीयांची माफी मागतो. अनेक लोकांच्या गैरसोयी होत आहेत. हातावरचे पोट असलेले लोक मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जात आहेत.त्यासाठी मी देशवासियांची माफी मागतो, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं.

 

महत्वाच्या बातम्या –

-कोरोनाच्या संकटात BSNLच्या ग्राहकांना गुडन्यूज; वैधता वाढली, इतक्या रुपयांचं रिचार्जही मोफत

-कौतुकास्पद! कोरोनाने हैदोस घातलेल्या स्पेनमध्ये मेसीने दिले तब्बल इतके कोटी

-अवधूत वाघांवर बहुतेक कोरोनाच्या धास्तीने परिणाम झालायं- अमोल मिटकरी

-हृदयद्रावक! चिमुकल्याचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमीची पायपीट

-आता तरी सुधरा राव, चीनमध्ये पुन्हा कुत्रा, मांजर, उंदीर, वटवाघूळ मांस विक्री सुरू!