“असंही एक दिवस मरणारच आहोत, त्यासाठी देश लॉकडाऊन करू शकत नाही”

नवी दिल्ली |  सगळ्या जगभरात कोरोनाने आपले हातपाय पसरले आहेत. ब्राझीलमध्येही जवळपास 4 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र एक ना एक दिवस आपल्याला मरायचंच आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेची वाट लावून लॉकडाऊन करू शकत नाही, असं धक्कादायक विधान ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सानारो यांनी केलं आहे.

कोरोना अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करेल या भितीने ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष देश लॉकडाऊन करण्याच्या विरोधात आहे.  कोरोनाने जर अर्थव्यवस्थेवर जबरा फटका बसला तर त्यातून सावरणं ब्राझिलसाठी आव्हान असेल या भितीने ते लॉकडाऊन जाहीर करत नाहीयेत.

ब्राझिलच्या काही राज्यांनी लॉकडाउन जाहीर केलं आहे. परंतू बोल्सोनारो मात्र लोकांना वारंवार कामावर परतण्याचं आवाहन करत आहेत. तुम्ही जर कामावर आला नाहीत तर त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, अशी भिती ते व्यक्त करत आहेत. इतकंच नाही तर सोशल डिस्टन्सिंगचा सल्ला मान्य करण्यास ते नकार देत आहेत.

दुसरीकडे जगभरातील बऱ्याचश्या देशांनी लॉकडाऊन जाहीर केलं. आवश्यक ती सर्व पावलं उचलून कोरोनाला नियंत्रित आणण्याचा प्रयत्न शासन करत आहे. मात्र ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यावर सगळेच आश्चर्य व्यक्त करू लागले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या –

-“मोदीजींना स्वतःबद्दल गैरसमज आहे त्यांना देश समजला नाही… त्यामुळे माफी मागून काहीही फरक पडणार नाही”

-कोरोनाच्या संकटात BSNLच्या ग्राहकांना गुडन्यूज; वैधता वाढली, इतक्या रुपयांचं रिचार्जही मोफत

-कौतुकास्पद! कोरोनाने हैदोस घातलेल्या स्पेनमध्ये मेसीने दिले तब्बल इतके कोटी

-अवधूत वाघांवर बहुतेक कोरोनाच्या धास्तीने परिणाम झालायं- अमोल मिटकरी

-आता तरी सुधरा राव, चीनमध्ये पुन्हा कुत्रा, मांजर, उंदीर, वटवाघूळ मांस विक्री सुरू!