महाराष्ट्र पोलीस दलात मोठी भरती; ‘या’ ठिकाणी मिळेल अधिक माहिती

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात मोठी भरती जाहीर झाली आहे. 3450 जागांसाठी ही भरती होणार असून, भरतीची जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात झाली आहे. भरती प्रक्रियेला 3 सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. 

23 सप्टेंबर पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मुंबईसाठी सर्वाधिक 1076, तर त्यानंतर पिंपरी चिंचवडसाठी सर्वाधिक 720 जागांसाठी भरती होणार आहे.

गृह विभागाने यंदा पोलीस भरतीप्रक्रियेमध्ये बदल केल्यानंतर महापोर्टलद्वारे होणारी ही पहिली भरती आहे. यापूर्वी मैदानी चाचणी अगोदर घेतली जात होती.

उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारालाच लेखी परीक्षेला पात्र ठरवले जात होते. मात्र नवीन निर्णयानुसार पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advpolice# या वेबसाईटवर जिल्हानिहाय जाहिरात पाहता येईल.

महत्वाच्या बातम्या-