रामदास आठवलेंनी सांगितला युतीचा ‘हा’ फॉर्म्युला!

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप 135-135 आणि मित्रपक्ष 18 जागा असा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीवेळी ठरला होता, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

युतीतील मित्रपक्षांपैकी रिपाई हा सर्वात मोठा पक्ष असल्याने आम्हाला 10 जागा द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 22 ते 23 जागांची यादी दिली आहे, असं रामदास आठवलेंनी सांगितलं.

भाजप-शिवसेना फायनल होईल त्यावेळी आम्हाला कुठल्या जागा द्यायच्या हे ठरेल. समस्या ही आहे भाजपने गेल्यावेळी आम्हाला ज्या 8 जागा दिल्या, त्या सर्व जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. जर रिपाई ला सोबत ठेवायचे असेल तर काही सिटिंग जागा शिवसेना भाजपकडून मिळायला हव्यात ही अपेक्षा आहे, असं आठवले म्हणाले.

माझा पक्ष रजिस्टर असातना भाजपच्या चिन्हावर का लढायचं, त्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. अद्याप त्याबाबत विचारविनीमय सुरु आहे, असंही त्यांनी सांगितलं.

रिपब्लिकन पक्षाने असे ठरवले आहे की पक्षाची ओळख वेगळी ठेवायची असेल तर आपल्या चिन्हावर लढले पाहिजे. मी महाराष्ट्र निवडणूक आयोगाशी बोलणार आहे. स्वतंत्र चिन्ह द्यावे त्यासाठी प्रयत्न आहे, असं आठवलेंनी नमूद केलं.

महत्वाच्या बातम्या-