चार पिढ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न

सोलापूर | महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगांची शासकीय महापूजा केली.

चार पिढ्यांच्या उपस्थित विठ्ठलाची महापूजा करणारे एकनाथ शिंदे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. एकनाथ शिंदेंचे वडिल ते त्यांचा नातू अशा शिंदे कुटुंबाच्या चार पिढ्या आषाढी एकादशी निमित्तच्या महापूजेला उपस्थित होत्या.

पहाटे 3 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास विठुरायाची शासकीय महापूजा पार पडली. यावेळी एकनाथ शिंदेंसह त्यांचे वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व नातू रूद्रांश शिंदे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांसोबत बीड जिल्ह्यातील गेवराई येथील नवले दांपत्याला यंदा शासकीय पूजेचा मान मिळाला आहे. मुरली भगवान नवले व जिजाबाई मुरली नवले यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली.

यंदा मुख्यमंत्र्यांच्या चार पिढ्यांनी एकत्र विठ्ठलाची महापूजा केली. तर एकनाथ शिंदे यांना त्यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे.

शनिवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे त्यांच्या कुटुंबीयांसह पंढरपूरात दाखल झाले. शासकीय विश्रामगृहातील एका कार्यक्रमानंतर एकनाथ शिंदे कुटंबासह मंदिरात दाखल झाले.

दरम्यान, तब्बल दोन वर्षांनी वारकऱ्यांच्या उपस्थितीने व विठुरायाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमली आहे. यंदा आषाढी वारी निर्बंधमुक्त पार पडत असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून 12 लाखांहूनही अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

रावसाहेब दानवेंच्या दाव्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ, म्हणाले…

‘जाण्याआधी उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं होतं’; बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य

घराबाहेर पडत असाल तर सावधान; पुढील 3 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती!

“शिवसेना आमच्या बापाची, शिवसेनेशी बेइमानी करणं पचणार नाही”