“आता जी राहिली आहे ती शिवसेना तरी फुटू देऊ नका”

जालना | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धक्यावर धक्के बसत आहेत. उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या दाव्याने शिवेसेनेचं टेंशन वाढलं आहे.

राष्ट्रपती निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेचे 12 खासदार संपर्कात आहेत. त्यांच्या दोन-तीन खासदारांनी तर उद्धव ठाकरेंना पत्रच दिलं आहे, असं दानवे म्हणालेत.

राहुल शेवाळेंसारखा दादरमधून निवडून आलेला खासदारही ठाकरेंना पत्र लिहितो. खासदार भावना गवळी यांना शिवसेनेने प्रतोदपदावरुन काढून टाकलंय. ही नावं उघड झाली आहेत, बाकीची नावं सांगत नाही, असं दानवेंनी म्हटलं आहे.

येणाऱ्या काळात सर्व निवडणुका आम्ही जिंकू, असा विश्वासही दानवेंनी व्यक्त केला. जी राहिली आहे, ती शिवसेना फुटू देऊ नका, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक-एक माणूस वेचून एवढी मोठी शिवसेना उभी केली, त्या शिवसेनेचे तुकडे करण्यात संजय राऊतांचा मोठा सहभाग आहे. आता तरी सांभाळा, वाक्य जपून वापरा, असा सल्ला दानवेंनी राऊतांना दिला आहे.

दरम्यान, पुढील नगरपालिका, पंचायत समित्या, महापालिका निवडणुका आम्हीच जिंकू. गेल्या वेळी 92 पैकी 82 नगरपालिका एकट्या भाजपने जिंकल्या होत्या. त्यावेळी तर युतीही नव्हती, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आमच्या सोबत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘जाण्याआधी उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं होतं’; बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य 

घराबाहेर पडत असाल तर सावधान; पुढील 3 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता 

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती! 

“बाळासाहेबांचा आत्मा बघतोय वरून, तुम्ही त्यांना आपले म्हणाल पण… “ 

आंध्र प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ; जगनमोहन रेड्डींच्या आई विजयलक्ष्मींचा मुलाला झटका