“कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी मी मोदींना विनंती करणार”

मुंबई | केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर देशात तीन कृषी कायदे लागू केले होते. या कायद्यांना जोरदार विरोध झाल्याचं पहायला मिळालं होतं. त्यानंतर पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात दंड थोपटले.

गेल्या वर्षभरापासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला होता. त्यानंतर आता अखेर हे केंद्र सरकारने नमती भूूमिका घेतली आहे.

स्वतंत्र भारतानंतर शेतकऱ्यांचं हे सर्वात मोठं आंदोलन होतं. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांना विरोध केल्यानंतर आता पंतप्रधानांनी हे तीन वादग्रस्त कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना तीन कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांनी जाहीर माफी देखील मागितली आहे.

अनेक दिग्गजांनी मोदींच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. अशातच आता महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्यांना जो चांगला दर मिळणार होता, ते कायदे आता पर्याय नसल्याने मोदींना मागे घ्यावे लागत आहेत. देशात अनेक महिन्यांपासून हे आंदोलन चालू आहे, परंतू अनेक शेतकऱ्यांना आणि संघटनांना हे कायदे मान्य नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

एका छोट्य़ा गटाला पटवून देण्यासाठी आम्हाला अपयश आलं आहे. देशातील अशांतता संपवण्यासाठी मोदींनी हा निर्णय घेतलाय, असं चंद्राकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

मी स्वत: नरेंद्र मोदींना विनंती करेल की, शेतकऱ्यांना समजून सांगून कृषी कायदे पुन्हा आणले पाहिजेत, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

एक विशिष्ट गट शेतकरी आंदोलनाचा विषय लावून धरत देशभर अडथळा निर्माण करत होता. कायद्यावर स्थगिती असताना देखील तुम्ही आंदोलन का करताय असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

मी स्वत: महाराष्ट्राचा कृषीमंत्री आणि पननमंत्री होतो. एक कायद्यामध्ये बाजाराच्या बरोबरीने बाजाराबाहेर विकायची परवानगी देण्यात येणार होती. यामध्ये चुकीचं काय होतं?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद”

  थंडीत ऊन-पावसाचा खेळ; येत्या 3 दिवस ‘या’ भागात पडणार जोरदार पाऊस

  ‘मोदींनी आता ‘ही’ मागणीही मान्य करावी’; मोदींच्या घोषणेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

  ‘…तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही’; राकेश टिकैत यांची प्रतिक्रिया

  “आम्हीच कमी पडलो, कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच”