“वाचाळीवर राऊत…. पवारांची विठ्ठलाशी तुलना महाराष्ट्र सहन करणार नाही”

मुंबई |  बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी चाळीतल्या पोरांना मंत्री बनवलंय. महाराष्ट्रात 2 विठ्ठल आहेत. एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. जितेंद्र आव्हाड यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांची तुलना त्यांनी विठ्ठलाशी केली होती. यावरच वारकरी संप्रदायाचे व अध्यात्मिक क्षेत्रातील आचार्य तुषार भोसले यांनी टीका केली आहे.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या महाराष्ट्राला महान असा आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे. विठ्ठल केवळ वारकरी सांप्रदायाचा नाही तर या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. सदा राजकीय नेत्यांची खुशमस्करी करणाऱ्या वाचाळवीर संजय राऊतांनी पवारांना चक्क विठ्ठलाची उपमा दिली आहे. मी वारकरी सांप्रदायाच्या वतीने याचा कडकडीत निषेध नोंदवतो, असं आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलं आहे. त्यांच्या व्हीडिओचं ट्वीट महाराष्ट्र भाजपने केलं आहे.

संजय राऊत यांच्या कृत्याची मी निंदा व्यक्त करतो. संजय राऊत यांनी केवळ महाराष्ट्राच्या अध्यात्मिक परंपरेचाच अपमान केला असं नाही तर अध्यात्मिक परंपरेचा व्देष करणाऱ्या आणि नास्तिक असणाऱ्या शरद पवारांची तुलना विठ्ठलाशी केल्याने विठ्ठल नावाच्या पावित्र्याचा भंग झाला आहे, अशी टीका तुषार भोसले यांनी केलीये.

दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याशी ते सहमत आहेत का? याचा लवकरात लवकर खुलासा करावा, असंही भोसले म्हणाले आहेत. आणि ते जर सहमत असतील तर वारीच्यावेळी वारकऱ्यांचे फोटो काढण्यापेक्षा शरद पवारांचेच फोटो काढायचे होते, असा निशाणाही त्यांनी साधला आहे.

आषाढी एकादशीला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना विठ्ठलाची पूजा करण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही जोपर्यंत ते राऊतांच्या वक्तव्याप्रकरणी खुलासा व्यक्त करत नाही. मी संजय राऊत यांना इशारा देतोय की त्यांनी आपले शब्द मागे घ्यावेत आणि समस्त अध्यात्मिक क्षेत्राची माफी मागावी, अन्यथा सांप्रदायिक क्षेत्र आपली ताकद दाखवून देईल, असंही भोसले म्हणाले आहेत.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-ठरवलं तर पाकिस्तानला फक्त 10 दिवसांत धूळ चारू- मोदी

सत्ता असताना गोट्या खेळत होता का?? जलीलांचा पंकजांना सवाल

-सरकार बरखास्त होईल अशी धमकी देणाऱ्या मुनगंटीवारांना थोरातांचं सडेतोड प्रत्युत्तर!

-राज ठाकरेंची कोलांटीउडी…. आता म्हणतात ‘माझा CAA ला पाठिंबा नाही’!

-“ज्यांची चौकशी करायचीये त्यांची लवकर करा… तुमचं सरकार कमी काळाचं आहे”