मुंबईत लाॅकडाऊनची शक्यता! कोरोना रूग्णसंख्येनं ठरलेला ‘तो’ आकडा ओलांडला

मुंबई | कोरोना महामारीने (Corona) मुंबईकरांच्या (Mumbaikar) नाकी नऊ आणल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाने मुंबईचं टेन्शन वाढवलं आहे. आजही कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं चित्र आहे.

मुंबईत आज दिवसभरात 20,181 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 2,837 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कमी झालेली रूग्णसंख्या आता झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच आज दिवसभरात 4 जणांनी प्राण गमावला आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 8,53,809 एवढी आहे. आतापर्यंत मुंबईत एकूण 16,381 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,55, 563 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी देखील आता 70 दिवसांवर आला आहे. त्यामुळे आता प्रशासनाचं टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे आता मुंबईत पुन्हा लाॅकडाऊन लागणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबईत दररोज 20 हजारांपेक्षा जास्त कोव्हिड रुग्ण आढळल्यास लॉकडाऊन लावावा लागेल, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता मुंबईत लाॅकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या नियमांनुसार रुग्णसंख्या 20 हजारांपेक्षा जास्त झाली. तर लॉकडाऊन करावा लागेल, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता लाॅकडाऊन लागणार का?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

दरम्यान, राज्यात लॉकडाऊनबाबत विचार केला जात नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. मात्र आता कोरोना रूग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्यानं आता लाॅकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या – 

राज ठाकरेंना अटक होणार?, समोर आलं ‘हे’ मोठं कारण…

“चंद्रकांत पाटलांचं संतुलन ढासळलंय, त्यांच्या तोंडात किती…”

संजय राऊत म्हणतात,”चंद्रकांत पाटलांनी मला चहा पाजायला हवा, मी त्यांना…”

Omicronची लक्षणं किती काळ राहतात?, स्वतःची टेस्ट कधी करावी?; वाचा सविस्तर

मोदींच्या सुरक्षेत त्रुटी अन् कंगना पंजाबवर भडकली, म्हणाली…