महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लावण्याचे प्रयत्न; ‘या’ महिन्यात होणार सत्तापालट?

नवी दिल्ली | राजकारणात सध्या बरीच उलथापालथ पाहायला मिळत आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थाननंतर आता महाराष्ट्रात राजकीय नाट्य रंगताना दिसत आहे. दिवाळी नंतर महाविकास आघाडी सरकारचं दिवाळं काढण्याचे प्लॅन भाजप आखत असल्याची माहिती भाजपच्या एका जेष्ठ नेत्याने दिली आहे.

सध्या कोरोनामुळे सत्तापालट करण्यात भाजपला काहीही रस नाही. मात्र, नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात सत्तापालट होऊ शकते. महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लावण्याचे नियोजन दिल्ली दरबारी सुरू आहे, अशी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातील सरकार आपल्या कर्माने हातातील सत्ता गमवेल. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर भाजप सरकार स्थापन करण्यासाठी शक्य ते प्रयत्न करेल. यासाठीची पाऊलही भाजप नेत्यांनी उचलली आहेत, अशीही माहिती मिळाली आहे

दरम्यान, फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यामध्ये अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. आखलेला डाव यशस्वीरीत्या पार पडावा यासाठी भाजपकडून संपूर्ण काळजी घेतली जात आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकारसाठी नोव्हेंबर महिना धोक्याचा असेल काय, हे पाहणं औत्सुक्याच ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या-

नरेंद्र मोदींनी ‘या’ मराठी माणसावर दाखवला विश्वास; सुपूर्द केली ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी

जिच्यासोबत बहिण म्हणून काम केलं, तिच्यासोबतच ‘या’ अभिनेत्यानं लग्न केलं!

धक्कादायक! मांत्रिकाने चक्क मुलीच्या कुटुंबियांसमोर केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

केरळनंतर राजस्थानमध्ये माणुसकीला काळीमा; उंटासोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य

चीनमध्ये तयार होतोय कोरोनापेक्षा खतरनाक व्हायरस; शास्त्रज्ञांचा धक्कादायक इशारा