काळजी घ्या! गेल्या 24 तासातील धडकी भरवणारी कोरोना आकडेवारी समोर

मुंबई | मागील काही दिवसांपासून देशातील तज्ज्ञांनी देशात लवकर कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर केंद्र सरकारने कोरोनाला रोकण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना निर्बंध कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकार आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे.

अशातच आता मागील काही दिवसांपासून राज्याच्या आकडेवारीत अचानक वाढ झाल्याचं दिसत आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत असल्याने आता आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात आज देखील मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढली आहे. आज तब्बल 11 हजार 877 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2,069 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

नवीन वर्षाच्या कार्यक्रमांमुळे होणाऱ्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारची चिंता देखील वाढली आहे.

राज्यात आज 50 ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 510 ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता ओमिक्राॅन देखील झपाट्याने वाढत असल्याचं दिसतंय.

गेल्या 2 दिवसांमध्ये राज्यातील रूग्णसंख्या ही दुप्पट झाल्याचं पहायला मिळतंय. तर राजधानी मुंबईमध्ये देखील कोरोना हातपाय पसरत असल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान, आज मुंबईत 7 हजार 792 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता मुंबईत येत्या दोन दिवसात मुंबईत निर्बंध लागण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘…तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईल’; विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य

“…म्हणून त्यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवलं”

कोरोनाचा हाहाकार! ‘या’ राज्यात उद्यापासून शाळा-काॅलेज बंद, नाईट कर्फ्यू लागू

तज्ज्ञ म्हणतात, ‘ओमिक्राॅनमुळे फायदाच होणार’; कसं ते वाचा सविस्तर

रवी गोडसे म्हणतात, “ओमिक्राॅन ही वाईट बातमी पण…”