भाजप आमदार म्हणतात, “मी अजितदादांचा फॅन, मी त्यांचं…”

बारामती | महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रकारची शिस्त आली.

राजकारणात कोणी कितीही मोठा कट्टर विरोधक असला तरी राजकारणाच्या पडद्यामागे दोन्ही शत्रू एकमेकांचे चांगले मित्र असतात. आता असाच काहीसा प्रसंग आज पहायला मिळाला.

भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भर कार्यक्रमात तोंडभरून कौतुक केलं आहे.

अजितदादांचे काम आणि अजितदादांचे कर्तृत्व आपल्याला माहीत आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी त्यांचा फॅन आहे, असं जयकुमार गोरे म्हणाले आहेत. मी अजितदादांची शिस्त मी पहिली आहे, असंही ते म्हणाले.

अजित पवार यांचं कौतुक केल्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जयकुमार गोरे यांना थेट राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली. भविष्यात चांगला विचार करा, असं म्हणत भरणे यांनी गोरेंनी ऑफर दिली आहे.

बारामतीच्या नेत्यांनी एखाद्याला हात दिला तर दगडात देखील पाणी काढू शकतात. आमच्या दादांचे तुम्ही तोंड भरून कौतुक केलं आहे. भाऊ तुम्ही हाडाचा कार्यकर्ता आहात, असं दत्तात्रय भरणे म्हणाले

चुकतो तोच माणूस असतो. आमच्या नेत्याचा उल्लेख चांगला केला आहे. तुमच्या डोक्यात चांगला विचार येउद्या आणि भविष्यात चांगला विचार करा, असं दत्तात्रय भरणे म्हणाले होते.

दरम्यान, अजित पवार आज बारामतीच्या कार्यक्रमात एक तास आधीच हजर झाले होते. कार्यक्रमात गर्दी होऊ नये म्हणून अजित पवारांनी लवकर कार्यक्रम उरकला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

“…त्यावेळी अनिल देशमुखांनी मदत केली”, नितीन गडकरींनी मानले आभार

काळजी घ्या! गेल्या 24 तासातील धडकी भरवणारी कोरोना आकडेवारी समोर

‘…तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईल’; विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य

“…म्हणून त्यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवलं”

कोरोनाचा हाहाकार! ‘या’ राज्यात उद्यापासून शाळा-काॅलेज बंद, नाईट कर्फ्यू लागू