“एक आमदार असलेला पक्ष 40 आमदारांचा मालक होणार का?”

मुंबई | उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रथमच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. फडणवीस यांनी शिवतीर्थावर ठाकरे यांची भेट घेतली. यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी मनसेवर खोचक टीका केली आहे.

शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केले. हे आमदार कुठल्या पक्षात जातील याबाबत उत्सुकता आहे. ते आमदार भाजपमध्ये जातील असे बोलले जात होते. ते भाजपमध्ये जाण्यास तयार नाही. ते प्रहारमध्ये जातील, तशीही परिस्थिती नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे 40 आमदार कुठल्या गटाचे आणि पक्षाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाच्या निकालानंतर सरकार किती वैध किती अवैध आहे हे स्पष्ट होणार आहे. 40 आमदारांचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हा प्रश्न घेवून राज ठाकरेंकडे गेले का, असा प्रश्न निर्माण होतोय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. या भेटीपश्चात ज्या पक्षाकडे एक आमदार आहे, तो पक्ष एका रात्रीत 40 आमदारांचा मालक होईल का?, असं तपासे म्हणालेत.

दीपक केसरकरांचं शरद पवार यांच्याबाबत  वक्तव्य चुकीचे होते, शरद पवार हे माणसं जोडणारे नेते आहेत तोडणारे नाहीत. केसरकर यांच्याकडे अनधिकृत सरकारच्या प्रवक्ते पदाची  जबाबदारी आहे. त्याच्यामुळे त्यांनी बोलताना थोड तारतम्य पाळलं असतं तर आनंद झाला असता, असंही ते यावेळी म्हणालेत.

दरम्यान, गेल्या महिन्यातच राज ठाकरेंवर हिपबोनची शस्त्रक्रिया झाली होती. त्या पार्श्वभूमीवरच फडणवीस यांनी ठाकरेंची सदिच्छा भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.

या भेटीच्या निमित्ताने राजकीय चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर चर्चा झाली अधिक शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘…म्हणून मी माईक खेचला’; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण 

महाविकास आघाडी कायम राहणार?, अजित पवारांचं मोठं वक्तव्य 

‘…तर मी राजकारण सोडेन’; एकनाथ शिंदे यांचं ओपन चॅलेंज 

सिनेसृष्टीला मोठा धक्का! प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शकाचा राहत्या घरी आढळला मृतदेह 

उद्धव ठाकरेंचा ‘तो’ निर्णय बेकायदेशीर म्हणत एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा!