‘…म्हणून मी माईक खेचला’; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट त्यांच्यासमोरून माईक काढून घेतला होता. त्यामुळे विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली. यावर देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे.

शिंदे यांच्यासमोरील माइक का घेतला यामागचं कारण त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे एका प्रश्नावर उत्तर देत होते. ते बोलत असतानाच, संबंधित प्रतिनिधीने हा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांना आहे, त्यांनी उत्तर द्यावं असं सांगितलं. त्यामुळे मी तो माइक घेतला. पण काहींनी ते म्युट करून दाखवलं, असं फडणवीसांनी सांगितलं.

मी एखादी चिठ्ठी लिहून दिली तर, त्यात गैर काय आहे. कुठल्याही सरकारमध्ये सुपर सीएम नसतो. तोच नेता आणि प्रमुख असतो, असं फडणवीसांनी म्हटलंय.

आमचा एकच सीएम आहे, ते म्हणजे एकनाथ शिंदे. त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत. प्रश्न हा आहे की काहींना ते बघवत नाही. तुम्हाला आता विरोधात बसण्याची सवय करायला हवी, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

दरम्यान, अजित पवारांनी देखील यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. नव्या सरकारमध्ये आतापासूनच माईक खेचायला आणि चिठ्ठ्या द्यायला सुरुवात झाल्याचे महाराष्ट्र पाहतोय, असं अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

महाविकास आघाडी कायम राहणार?, अजित पवारांचं मोठं वक्तव्य 

‘…तर मी राजकारण सोडेन’; एकनाथ शिंदे यांचं ओपन चॅलेंज 

सिनेसृष्टीला मोठा धक्का! प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शकाचा राहत्या घरी आढळला मृतदेह 

उद्धव ठाकरेंचा ‘तो’ निर्णय बेकायदेशीर म्हणत एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा! 

“आज माईक ओढला, उद्या पॅन्ट ओढतील आणि तुम्हाला नागडं करतील”