ममता बॅनर्जींचा थेट उद्धव ठाकरेंना फोन; सेना आमदार सरनाईक दखल घेण्यासाठी रवाना

मुंबई |  कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक फैलावू नये, यासाठी सध्या देशात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे प्रचंड हाल होत आहे. महाराष्ट्रामध्ये कामानिमित्त वास्तव्याला असणाऱ्या पश्चिम बंगालच्या कामगारांच्या काळजीपोटी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला.

मुंबईच्या मीरा रोड परिसरात प्रसिद्ध बांधकाम बिल्डर जे. पी. इन्फ्रा यांचं काम सुरू आहे. त्यांच्या कामावर पश्चिम बंगालचे काही मजदूर कुटुंब कामाला आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्या कामगारांना बिल्डरने पगार दिलेला नाहीये. तसंच लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या काळजीपोटी थेट बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला.

उद्धव ठाकरेंना फोन करून संबंधित कुटुंबांसाठी अन्न पाण्याची सोय करावी, अशी विनंती बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांना केली. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या बोलण्याला सकारात्मक प्रतिसाद दर्शवत आवश्यक ती सगळी मदत केली जाईल, असा शब्द त्यांना दिला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी लगोलग सेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधत त्यांना घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यास सांगितलं. तसंच त्यांच्या मदतीसाठी जे काही करता येईल त्याचे आदेश दिले.

महत्वाच्या बातम्या –

-गानसम्राज्ञी लतादिदी सरसावल्या; कोरोनाच्या लढाईत दिली इतक्या लाखांची मदत

-…म्हणून महाराष्ट्र उद्धवजींच्या हाती असल्याचा अभिमान वाटतो- जितेंद्र आव्हाड

-लॉकडाउनला ठेंगा! भाजप आमदारानं थाटात केलं मुलीचं लग्न

-ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींच्या वेतनात होणार ‘इतकी’ कपात

-मी अनेकदा बँकांना सर्व पैसे देण्याची ऑफर दिली होती पण…- विजय मल्ल्या