गानसम्राज्ञी लतादिदी सरसावल्या; कोरोनाच्या लढाईत दिली इतक्या लाखांची मदत

मुंबई |  कोरोनाचा लढा जिंकण्यासाठी विविध स्वयंसेवी तसंच सेवाभावी संस्था, उद्योगपती, राजकारणी मंडळी, कलाक्षेत्रातली मंडळी तसंच खेळाडू पुढे येऊन मदतीचा हात देत आहेत. भारतरत्न लता मंगशेकर यांनीही आपली सामाजित जबाबदारी ओळखून मदतीसाठी एक एक पाऊल पुढे टाकलं आहे.

लता मंगशेकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 25 लाख रूपयांची मदत केली आहे. त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

नमस्कार. आपण आपल्या सरकारला या कठिण प्रसंगी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. मी माझ्या तर्फ़े मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 लाख रुपये देत आहे, असं ट्विट करत सरकारच्या कोरोना विरोधी लढ्यात आपण सुद्धा सरकारला यथाशक्ति मदत करावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या कठीण काळातून सावरण्यासाठी सर्वच स्तरातून लोक आता मदतीसाठी पुढे येऊ लागले आहे. तसंच विविध देवस्थानांच्या संस्थांनांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

-…म्हणून महाराष्ट्र उद्धवजींच्या हाती असल्याचा अभिमान वाटतो- जितेंद्र आव्हाड

-लॉकडाउनला ठेंगा! भाजप आमदारानं थाटात केलं मुलीचं लग्न

-ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींच्या वेतनात होणार ‘इतकी’ कपात

-मी अनेकदा बँकांना सर्व पैसे देण्याची ऑफर दिली होती पण…- विजय मल्ल्या

-“असंही एक दिवस मरणारच आहोत, त्यासाठी देश लॉकडाऊन करू शकत नाही”