मोदींचा गड असणाऱ्या वाराणसीत ममता थेट भाजप कार्यकर्त्यांना भिडल्या, झालं असं की…

लखनऊ | देशात सध्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. देशातील सर्वाचं लक्ष सध्या उत्तर प्रदेश निवडणुकीकडं लागलं आहे.

विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजकीय जीवनातील सर्वात कठीण परीक्षा म्हणून या निवडणुकीकडं पाहिलं जात आहे. तर समाजवादी पार्टी सत्तेत येण्यासाठी ताकद लावत आहे.

उत्तर प्रदेशात भाजप, काॅंग्रेस, सपा, बसपा यांच्यात प्रमुख लढत होत आहे. काॅंग्रेस महासचिव प्रियंका गांधींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे.

समाजवादी पक्षाच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाल्यानं राजकीय वातावरण तापलेलं आहे. भाजप कार्यकर्त्यांना ममतांचा विरोध केला.

ममता बॅनर्जी या दशाश्वमेध घाटावर गंगा आरती करण्यासाठी गेल्या होत्या. त्या गाडीतून त्या ठिकाणी येत असतानाच हिंदू युवा वाहिनीच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात निदर्शने केली आहेत.

कार्यकर्ते जाण्याची वाट न बघता ममता या त्या कार्यकर्त्यांसमोर उभ्या राहिल्या. त्यानंतर या घटनेचा निषेध म्हणून ममता खुर्चीवर बसण्याऐवजी खाली बसल्या होत्या.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी मला परत जाण्यास सांगितलं. भाजप कार्यकर्त्यांच्या मनात हिंसाचाराशिवाय दुसरं काही येत नाही. भाजपचा उत्तर प्रदेशमध्ये पराभव अटळ आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदारसंघात सध्या जोरदार राजकीय कलगीतूरा रंगला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत ममतांनी भाजपला आव्हान दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

रशिया-युक्रेन युद्धाचा SBI ला फटका; ‘या’ कारणामुळे कोट्यावधी रूपये अडकले

भारताच्या प्रयत्नांना यश! युद्धजन्य परिस्थितीत रशिया भारताला मदत करणार

  “सापाच्या पिलाला आम्ही 30 वर्षे दूध पाजले, ते पिल्लू आता आमच्यावरच फुत्कारतंय”

  आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक सज्ज

  “सरकार पडणार, सरकार पडणार, माझे 170 मोहरे फोडून दाखवाच”