पंतप्रधान मोदी आणि ममता ब‌ॅनर्जी दिसणार एकाच व्यासपीठावर!

नवी दिल्ली | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कडाडून विरोध करत आहेत. येत्या 13 जानेवारीला दिल्लीत नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात विरोधी पक्षांची  बैठक होणार आहे. मात्र 13 तारखेच्या आधी 12 तारखेला ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील ‘कोलकाता पोर्ट ट्रस्ट’ला 12 तारखेला 150 वर्ष पूर्ण होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे. याच कार्यक्रमाच्या औचित्यावर ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी एकत्र येणार असल्याची माहिती आहे.

शनिवारी नरेंद्र मोदी कोलकात्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता त्यांची ममता बॅनर्जी यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्यावरुन विविध विद्यापीठांत होत असलेली हिंसक निदर्शने व त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 13 जानेवारीला दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-