उद्धव ठाकरेंकडून तानाजी सावंतांना घरचा आहेर???

मुंबई | शिवसेना नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला तानाजी सावंतांच्या अनुपस्थितीमुळे नाराजीत भरच पडली आहे. त्यामुळे सावंताची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.

तानाजी सावंत यांच्या संदर्भात आज मातोश्रीवर आढावा बैठक बोलावण्यात आली आहे. शिवसैनिकांची नाराजी लक्षात घेता सावंत यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मातोश्रीवरील आढावा बैठकीत  काय निर्णय घेतला जातो याबाबत उत्सुकता आहे.

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे तानाजी सावंत पक्षावर नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी पक्षप्रमुखांना बोलावून दाखवली होती. मात्र यावरुन सावंत आणि ठाकरे यांच्यात खटके उडाल्याची माहिती आहे.

दरम्यान, सावंत यांनी बंडखोरी करत उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपशी घरोबा केला होता. महाआघाडीत आपल्या पुतण्याला उपाध्यक्षपद मिळत नसल्याने सावंतांनी ही खेळी केली होती. त्यांच्या या पक्षविरोधी कृतीमुळे सेना नेतृत्व नाराज आहे

महत्वाच्या बातम्या-