मुंबई : मुंबई विमानतळावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला ‘आयटम’ असं संबोधणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तक्रारदार महिलेने विलेपार्ले परिसरात 26 वर्षीय आरोपीचा पाठलाग करुन त्याची धरपकड केली होती.
मुंबई विमानतळावर काम करणारी तक्रारदार महिला कर्मचारी शुक्रवारी संध्याकाली काम आटोपून घराच्या दिशेने निघाली होती. राजेंद्र प्रसाद नगर भागातील बस स्टॉपवर महिलेला तिच्या सहकाऱ्याने ड्रॉप केलं.
त्यावेळी 26 वर्षांच्या दिनेश यादवने तिला पाहून ‘आयटम’ अशी हाक मारली. त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा महिलेने थरारक पाठलाग केला. दिनेशला पकडून तिने पोलिसांच्या ताब्यात दिलं.
पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 354 अ (लैंगिक छळ), 509 (महिलेचा विनयभंग करण्याचा उद्देश) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सध्या त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, घटना घडली त्यावेळी आरोपी मद्याच्या अंमलाखाली असल्याचा दावा केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ नेत्याला विधानसभेसाठी दोन पक्षाने दिली उमेदवारी! – https://t.co/zKOxPWq3B9 #विधानसभा2019
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 24, 2019
मी काय बांगड्या भरल्या नाहीत; उदयनराजे भोसलेंचं नवाब मलिकांना प्रत्युत्तर – https://t.co/nEGE0s92sq #विधानसभा2019
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 24, 2019
शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार; राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप – https://t.co/lshB8Y4eyr @nawabmalikncp @Dev_Fadnavis #विधानसभा2019
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 24, 2019