‘या’ नेत्याला विधानसभेसाठी दोन पक्षाने दिली उमेदवारी!

मुंबई | प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 22 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. उमेदवार यादी जाहीर करताना वंचित आघाडीने नावासमोर उमेदवारांची जातही लिहिली आहे.

वंचित आघाडीने कोल्हापुरातील करवीर विधानसभा मतदारसंघातून आनंद गुरव यांना उमेदवारी दिली. मात्र आनंद गुरव हेच नाव 23 सप्टेंबर ‘आप’च्या यादीतही होतं. आप आणि वंचित बहुजन आघाडीने जाहीर एकच उमेदवार घोषित केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

आपने विधानसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवार जाहीर केले. यामध्येही करवीर विधानसभा मतदारसंघातून आनंद गुरव यांनाच उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे माणूस एक आणि उमेदवारी दोन पक्षातून, असं चित्र पाहायला मिळत आहे.

आनंद गुरव यांना काल आपने आणि आज वंचितने उमेदवारी दिल्याने, एक व्यक्ती आणि दोन पक्षांची उमेदवारी असं दिसून येत आहे. त्यामुळे आनंद गुरव नेमके कोणत्या पक्षातून लढणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-