Election Results 2022 | मनोहर पर्रिकरांचे सुपुत्र उत्पल पर्रिकरांचा पराभव

पणजी |  देशातील सर्वांचं लक्ष लागलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला 8 वाजता सुरूवात झाली आहे. परिणामी सर्वत्र सध्या राजकीय जुगलबंदी रंगली आहे.

भाजपला चार राज्यात असलेली आपली सत्ता राखण्यात यश येतं का या प्रश्नाचं उत्तर आता मिळणार आहे. गोव्यात भाजप आणि काॅंग्रेसमध्ये जोरदार टक्कर मिळत आहे.

गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर परत सत्ता मिळवण्याची मोठी जबाबदारी भाजपनं टाकली होती. परिणामी गोव्याच्या निवडणुकीची चर्चा महाराष्ट्रात देखील होती.

फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या मुलाला पणजी मतदारसंघातून उमेदवारी दिली नव्हती. परिणामी उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता.

उत्पल पर्रिकरांचा हा निर्णय त्यांच्याच अंगलट आला आहे. उत्पल पर्रिकर यांना भाजपच्या उमेदवाराकडून पराभव स्विकारावा लागला आहे.

मनोहर पर्रिकरांच्या पारंपारिक मतदारसंघातून उत्पल पर्रिकर हे निवडणूक लढवत होते. परिणामी याठिकाणी चुरशीचा सामन्यात भाजपनं त्यांना पराभवाची धुळ चारली आहे.

दरम्यान, भाजपनं गोव्याची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. देवेंद्र फडणवीस ज्या ठिकाणी जातात तिथं सत्ता जाते, अशी टीका महाविकास आघाडीनं केली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

 Election Results 2022 | शिवसेनेला मोठा धक्का! एकाही जागेवर उमेदवार आघाडीवर नाही

“आमचं राजकारण नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं” 

गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर; ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला 

निकालाच्या 12 तास अगोदर गोव्यात हालचालींना वेग; काँग्रेसचे दिग्गज नेेते गोव्यात दाखल 

“महाविकास आघाडी सरकारला कुणीही धक्का लावू शकणार नाही”