“उदयनराजेंचा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाला तर सरकारचं दहावं घालू”

पुणे  | भाजप सरकार उदयनराजे भोसले यांची फसवणूक करत आहे. महाराष्ट्रतील मराठा समाज सरकारवर नाराज आहे म्हणून त्यांचा पक्षप्रवेश करवून घेतला. मात्र त्यांना पाडण्याचं षडयंत्र सरकारकडून रचलं जात आहे. असं  झालं आणि उदयनराजेंचा पोटनिवडणुकीत पराभव झाला तर आम्ही या सरकारचा दहावं घालू, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पुण्यातल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला.

नाशिकला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत उदयनराजे यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती. उदयनराजे मराठा समाजाचे राजे आहेत. त्यांना अशी वागणूक दिलेली मराठा समाज सहन करणार नाही, असा इशारा या संघटनेने सरकारला दिला आहे. 

उदयनराजेंना निवडून आणण्याची जबाबदारी भाजपच्या मंत्र्यांची आहे. जर त्यांचा पराभव झाला तर राज्यात हाहाःकार माजेल, असंही या संघटनेकडून सांगण्यात आलं.

मराठा आरक्षणाला विरोध करण्याऱ्या नेत्यांच्या विरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चा प्रचार करणार आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्या पंकजा मुंडे, छगन भुजबळ, महादेव जानकर यांना मराठा समाज जागा दाखवेल,  असंही या संघटनेकडून  स्पष्ट करण्यात आलं.

दरम्यान सातारा लोकसभा पोटनिवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. साताऱ्यात कोण विजयी होतं? हे अवघ्या काही दिवसात स्पष्ट होईल.

महत्वाच्या बातम्या-