अस्ताव्यस्त युक्रेन! रशियन सैन्याच्या रडावर आता युक्रेनमधील ‘ही’ महत्त्वाची गोष्ट

नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धानं (Russia Ukraine War) अवघ्या जगाची चिंता सध्या वाढवलेली आहे. बऱ्याच प्रमाणात रशियावर निर्बंध लावूनही रशिया युद्ध थांबवण्याचा मानसिकतेत नाही.

रशियन सैन्याला जगातील सर्वात घातक सैन्यापैकी एक मानलं जातं. असं असलं तरी रशियाला युक्रेनवर ताबा मिळवत आलेला नाही. आता रशियन सैन्यानं सर्वात महत्त्वाच्या शहरावर जोरदार हल्ला केला आहे.

कीव, खारकीव्ह या शहरांव्यतिरिक्त महत्त्वाचं असलेलं मारियुपोल हे बंदर मिळवण्यासाठी रशियन सैन्य मोठी मेहनत घेत आहे. मारियुपोल शहरावर रशियाला ताबा मिळवू देणार नाही, असं युक्रेननं स्पष्ट केलं आहे.

मारियुपोल हे दक्षिण आणि पुर्व युक्रेनला जोडण्याचं काम करतं. युक्रेनच्या विकासात मारियुपोल बंदराचा फार मोठा वाटा आहे. परिणामी रशियाला या बंदरावर ताबा मिळवायचा आहे.

मारियुपोल शहरातील महत्त्वाच्या स्टिल प्लॅंटला रशियन सैन्यानं लक्ष्य केलं आहे. परिणामी हजारो नागरिक अडकल्याची भिती आता वर्तवण्यात येत आहे.

मारियुपोल शहरामध्ये युरोपमधील सर्वात मोठा लोखंड आणि स्टिलचा प्लॅंट आहे. या शहरावर हल्ला केल्यानंतर युक्रेनच्या अर्थव्यवस्थेला तडा गेला आहे.

मारियुपोल शहरात आता सामान्या नागरिकांना राहाण्यासारखी परिस्थिती राहिली नाही. रशियन सैन्य आणखीन मोठ्या प्रमाणावर हल्ला करण्याची तयारी देखील करत आहे.

दरम्यान, मारियुपोलवर रशियानं आतापर्यंत मोठे हल्ले केले आहेत. परिणामी 80 टक्के मारियुपोल शहर उद्ध्वस्त झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 हनुमान चालीसा प्रकरण! दिलासा मिळाल्यानंतरही रवी राणांची आजची रात्र तुरूंगातच

“1857 च्या युद्धात तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत मी लढलो असेल”

अडीच वर्षे तुम्ही काय केलं? पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

“भोंगेंबाज राजकारण्यांनी आज हिंदूत्त्वाचा सुद्धा गळा घोटला”

मोठी बातमी! ओबीसी आरक्षण प्रकरणी राज्य सरकारला दणका