मुंबई | बाॅलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या लग्नाचा विषय आता राष्ट्रीय झाला आहे. विविध चर्चा आणि संवादामधून देखील हा विषय सुटलेला नाही.
सलमान वयाच्या 56 व्या वर्षी देखील अविवाहीत का आहे याचं कारण शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. अन् अनेक जावईशोध देखील लावले आहेत.
बाॅलिवूड, हाॅलिवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्रींसोबत सलमानचं नाव अनेकदा जो़डण्यात आलं आहे. पण लग्नापर्यंत एकही अभिनेत्री पोहचू शकली नाही.
सलमानला लग्नाच्या बोहल्यावर चढलेलं पहायला चाहते आणि त्याच्या घरचे देखील आसुसले आहेत. अशात सलमानचे वडील प्रसिद्ध लेखक सलीम खान यांनी एक खुलासा केला आहे.
सलमानच्या आयुष्यात संगीता बिजलानी ते करतरिन कैफपर्यंत अनेक सौंदर्यवती आल्या. पण कोणासोबतही सलमाननं लग्न केलं नाही.
सलीम खान यांनी याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. सलमान एखाद्या मुलीशी रिलेशनशिपमध्ये असेल तेव्हा त्या मुलीत तो त्याच्या आईला पहातो अन् नेमकी हीच गोष्ट तरूणींना खटकते, असं सलीम खान म्हणाले आहेत.
सलमानच्या अशा वागण्याला कंटाळून त्याच्या गर्लफ्रेंडनी त्याला सोडलं असंही सलीम खान म्हणाले आहेत. सलमानच्या लग्नाचा एक मुहुर्त ठरल्याचं देखील सलीम खान म्हणाले आहेत.
18 नोव्हेंबर 1999 मध्ये सलमानचं एका मुलीशी लग्न ठरलं होतं. लग्नाच्या आदल्या दिवशी लग्नाचा मुड नाही म्हणत सलमाननं लग्न थांबवल्याचा खुलासा सलीम खान यांनी केला आहे.
दरम्यान, सलमानच्या लग्नाबाबत सलीम खान यांचं वक्तव्य ऐकून अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘आगामी निवडणुकीत भाजप 27 टक्के तिकीटे ओबीसींना देऊन समाजाला न्याय देईल’
हनुमान चालीसा प्रकरण! दिलासा मिळाल्यानंतरही रवी राणांची आजची रात्र तुरूंगातच
“1857 च्या युद्धात तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत मी लढलो असेल”
अडीच वर्षे तुम्ही काय केलं? पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल
“भोंगेंबाज राजकारण्यांनी आज हिंदूत्त्वाचा सुद्धा गळा घोटला”