अजित पवार असू शकतात राष्ट्रवादी काँग्रसचे उपमुख्यमंत्रिपदाचे उमेदवार!

मुंबई | भाजपसोबत गेलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी साथ सोडल्यानं तीनच दिवसात फडणवीस सरकार कोसळलं आहे. आता अजित पवार स्वगृही परत येण्याची शक्यता निर्माण झाली असून तेच राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, असं कळतंय.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकासआघाडीचा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झालाय. आता महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार असून अडीच वर्षे काँग्रेस आणि अडीच वर्षे राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री असेल, असं कळतंय.

काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेब थोरात यांचं नाव पुढं करण्यात येणार असल्याचं कळतंय. तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटलांचं नाव पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दुसरीकडे अजित पवार पक्षात परत येण्याची शक्यता असून पक्षातील दादा समर्थकांची संख्या पाहता त्यांचं नाव देखील पुढं येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पहिली अडीच वर्षे कुणाचा मुख्यमंत्री राहणार? यावर सारी गणितं अवलंबून असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-