अजितदादा We Love You; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

मुंबई | अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि राष्ट्रवादीत परतावं, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. त्यांच्या याच प्रयत्नांना यश आलं आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर ते आता महाआघाडीच्या बैठकीला उपस्थिती लावणार असल्याची माहिती आहे. त्याचमुळे हॉटेल ट्रायडेंटच्या बाहेर अजित पवार यांच्या समर्थकांनी अजितदादा We Love You, असे फलक झळकवायला सुरूवात केली आहे.

एकच वादा अजितदादा….  अजित पवार तुम आगे बढो- हम तुम्हारे साथ हैं, महाराष्ट्राचा बुलंद आवाज… शरद पवार… शरद पवार, अशा घोषणा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देत आहेत. तिन्ही पक्षांच्या आमदारांच्या बस हॉटेल ट्रायडंटच्या दिशेने रवाना रवाना झाल्या आहेत.

अजित पवार यांचं बंड थंड करण्यासाठी पवार कुटुंबियांनी मोठे शर्थीचे प्रयत्न केले. सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी अजित पवार यांची भेट घेत मध्यस्थी केली. तर अजित पवार यांच्या तीन आत्यांनी देखील त्यांची समजूत काढल्याची देखील माहिती आहे.

दरम्यान, अजित पवार यांचे जवळचे मित्र आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे हे अजितदादांना ट्रायडंटला घेऊन येणार असल्याची माहिती आहे. थोड्याच वेळात याठिकाणी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संयुक्त बैठक पार पडणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-