“कोरोना वुहानच्या ज्या प्रयोगशाळेतून निघाला त्याचा मालक बिल गेट्स”

मुंबई | कोरोनाच्या रूग्णसंख्येत सातत्यानं चढ-उतार पहायला मिळत आहेत. जागतिक स्तरावर कोरोनाच्या ओमिक्राॅन या नव्या व्हेरियंटनं मोठा धुमाकूळ घातला आहे. परिणामी सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे.

जागतिक आरोग्य संघटना सध्या सर्व प्रकारच्या कोरोना रूग्णांवर लक्ष ठेवून आहे. गेल्या दीड वर्षात कोरोनानं अनेकदा नवीन व्हेरियंटमुळे सर्वांचं टेन्शन वाढवलं असताना आता नवीन माहिती समोर येत आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी कोरोना प्रयोगशाळेवरून थेट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीवर गंभीर आरोप केले आहेत. परिणामी सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.

चिनमधील वुहान येथील प्रयोगशाळेत कोरोना विषाणुचा उगम झाल्याचं अवघ्या जगाला माहिती आहे. मात्र आता थेट ज्या प्रयोगशाळेत हा विषाणू आला ती प्रयोगशाळा श्रीमंत व्यक्तीची आहे, असा आरोप पाटकर यांनी केला आहे.

कोरोना ज्या प्रयोगशाळेतून निघाला त्या प्रयोगशाळेचे मालक बिल गेट्स आहेत, असा गंभीर आरोप पाटकर यांनी केला आहे. बिल गेट्स फाऊंडेशनने पुर्ण जगातील शेतीवर कब्जा करण्याचं ठरवलं आहे.

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यावर देखील पाटकर यांनी जहरी टीका केली आहे. तोमर यांनी काही दिवसांपूर्वी बिल गेट्स यांना भारतात येण्याचं आमंत्रण दिलं होतं, असंही पाटकर म्हणाल्या आहेत.

बिल गेट्स अमेरिकेतील तब्बल 2 लाख 40 हजार शेती आपल्या कब्ज्यात ठेवली आहे. परिणामी आता भारतात आपल्या उद्योगाचा विस्तार करण्याचा त्यांचा मानस असल्याचं पाटकर म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

दहावी, बारावी पास असणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिस विभागात नोकरीची सुवर्णसंधी! 

‘मॅचपूर्वी सेक्स केल्याने मला…’; ‘या’ प्रसिद्ध माजी खेळाडूचा मोठा खुलासा

पाकिस्तानी बाॅलरला राग अनावर! भर मैदानात खेळाडूच्या कानाखाली मारली; पाहा व्हिडीओ

“भाजप म्हणजे देशाच्या राजकीय व्यवस्थेला लागलेली वाळवी”

हर्षला होतोय भारतीसोबत लग्न केल्याचा पश्चाताप, म्हणाला…