राज ठाकरेंच्या भेटीनंतर मिलिंद एकबोटेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी आज कृष्णकुंजवरती जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या हिंदूत्वाच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया मिलिंद एकबोटे यांनी दिली.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त पुण्यातील वढू-बुद्रुक येथे एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.  त्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी ते कृष्णकुंज वर गेले होते.

एकबोटे आणि राज ठाकरेंमध्ये सुमारे दहा ते पंधरा मिनिटेे चर्चा झाली. राज ठाकरेंनी वढू-बुद्रुकला येऊन संभाजी महाराजांचं दर्शन घ्यावं आणि उपस्थित शंभू भक्तांना मार्गदर्शन करावं, अशी विनंतीसुद्धा त्यांनी यावेळी केली आहे.

मिलिंद एकबोटे हे भीमा-कोरेगांव हिंसाचार प्रकरणापासुन बरेच चर्चेत आहेत. तर त्यांच्यावर दंगलभडकवल्या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या – 

आपला पॅटर्नच वेगळा; मुळशीत लग्न लागताच गाड्या फटाक्यासारख्या पेटल्या!

-YES बँकेच्या संस्थापकांना 11 मार्चपर्यंत ईडीची कोठडी

-भ्रष्टाचार करणाऱ्यांचे हात तोडावे लागतील- बच्चू कडू

-अरे देवा…यांनी तर तुम्हालाही रांगेत उभं केलं; प्रकाश राज यांची टीका

-महिला दिनी जयंत पाटील फेसबुक लाईव्हद्वारे करणार कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव