इम्तियाज जलीलांनी प्रकाश आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल नवा संभ्रम!

औरंगाबाद | विधानसभा निवडणुकीआधी वंचित बहुजन आघाडीमध्ये जागावाटपावरून वाद झाला. त्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा संभ्रम निर्माण झाला आहे.

एमआयएमने कुठलंही लॉक लावलेलं नाही. प्रकाश आंबेडकर यांनी मला आदेश करावा मी त्यांच्या आदेशाचं पालनच करेन. आजही मी आंबेडकरांना वंचितचा सर्वेसर्वा मानतो. शेवटपर्यंत बाळासाहेबांच्या आदेशाची वाट पाहत राहीन, अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

आधी जागावाटपावरून प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करणाऱ्या जलील यांनी आता असं वक्तव्य केल्याने वंचित आघाडीचं सूत पुन्हा जुळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने वंचित आघाडीला मतदान केले नाही. ‘एमआयएम’सोबत युती तुटली तरी त्याचा वंचित आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही,’ अशी प्रतिक्रिया एमयाएमने साथ सोडल्यानंतर ‘वंचित’चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती.

प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून तो एमआयएमला सुद्धा आहे, अशा शब्दात एमआयएमला पुढील वाटचालीसाठी बाळासाहेबांनी शुभेच्छाही दिल्या होत्या. 

महत्वाच्या बातम्या-