“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिशय चांगलं काम करत आहेत”

मुंबई |  कोरोनाच्या कठीण काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिशय चांगलं काम करत आहेत. ते कधीही मंत्री नव्हते मात्र ते उत्तम प्रशासक आहेत, अशा शब्दात काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. ते बीबीसी मराठीशी बोलत होते.

उद्धव ठाकरे उत्तमरित्या काम करत आहेत. मात्र तरीदेखील त्यांच्या कामात काही उणीवा राहिल्या तर आम्ही त्या भरून काढू, असं अशोक चव्हाण म्हणाले. राज्याची आरोग्य यंत्रणा तसंच पोलिस उत्तम काम करत असल्याचंही ते म्हणाले.

दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपने केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं. आताची परिस्थिती ही राजकारण करण्याची तसंच ब्लेम गेम करण्याची वेळ नाही. आपल्याला राजकारण करायला खूप वेळ आहे कोरोनाचं संकट गेल्यानंतर आपल्याला ते करता येईल, अशा शब्दात त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं.

सद्याच्या कठीण काळात विरोधी पक्षाने आणि सरकारने हातात हात घालून काम करणं गरजेचं आहे. उणीवा असतील तर त्या नक्की आम्ही भरून काढू त्यासाठी विरोधकांनी सकारात्मक सूचना जरूर कराव्यात, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

-विनय दुबेला मी ओळखत नाही – गृहमंत्री अनिल देशमुख

-मुंबईचं इटली होणार, आपल्याला खंबीर नेतृत्वाची गरज- रंगोली चंडेल

-घरात दारु कशी बनवावी? लॉकडाऊनच्या काळात गुगलवर ट्रेंड

-भारतात वटवाघळामुळे कोरोना पसरला का? ICMR चे संशोधक म्हणतात…

-“देशाचा सगळ्यात मोठा शत्रु कोरोना नाही तर अफवा पसरवणारे आहेत .. त्यांच्या पासून लांब राहा ..”