Top news नागपूर महाराष्ट्र

संकटात राजकारण करणाऱ्या विरोधकांना जनता रस्त्यावर फिरू देणार नाही- बच्चू कडू

अकोला |   कोरोनाच्या लढाईत ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे अशी तक्रार राज्यपालांकडे करत भाजपने राज्यभर आंदोलन केलं. तसंच देवेंद्र फडणवीस सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री बच्चू कडू यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जोरदार समाचार घेतला आहे.

संकटात राजकारण करणाऱ्या विरोधकांना जनता रस्त्यावर फिरू देणार नाही, अशा शब्दात बच्चू कडू यांनी विरोधी पक्षाचा समाचार घेतला आहे. सत्तेत येण्याची स्वप्न पाहायची विरोधी पक्षाने सोडून द्यावीत, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.

सध्याच्या कठीण काळात विरोधकांकडून अशा प्रकारचं राजकारण अपेक्षित नाही. अशा वेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन कम करायला हवं आणि त्यातून देश आणि राज्याला बाहेर काढायला हवं, असं बच्चू कडू म्हणाले.

विरोधकांनी ज्या पद्धतीने टीकेचा, आंदोलनाचा मार्ग निवडला आहे तो योग्य नाही. विरोधी पक्षाने सरकारला सहकार्य करावं. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. सरकारला या कामात यश येईल, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-नरेंद्र मोदींकडून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंना अभिवादन, म्हणाले…

-या भारतीय अॅपचा टिकटॉकला जबर दणका; टॉप चार्टमध्ये टिकटॉकला मागे टाकत दुसऱ्या नंबरवर

-“ठाकरे सरकार 11 दिवसही टिकणार नाही, असं म्हणणार्‍यांचं बारावं घालून सरकारने 6 महिने पूर्ण केले”

-बिनकामी माणसं सरकार पाडण्याचा विचार करतात, पवारांचा फडणवीसांवर निशाणा

-‘बाबा तुमची नेहमी आठवण येते’; विलासरावांच्या आठवणीत रितेश भावूक, पाहा व्हिडिओ