मला जीवदान मिळालंय… यापुढचं जीवन लोकांच्या सेवेत घालवेन- धनंजय मुंडे

मुंबई |  कोरोनातून मी आता बरा झालोय. महाराष्ट्रातील 12 लोकांचे आशीर्वाद, आई वडिलांची पुण्याई आणि कार्यकर्त्यांचं प्रेम याच्या बळावर मी कोरोनावर मात केली आहे. मला आता जीवदान मिळालंय. यापुढचं जीवन महाराष्ट्रातील लोकांच्या सेवेत घालवेन, असं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ते शासकिय नियमानुसार त्यांच्या घरी क्वारंटाईन आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलतना त्यांनी कोवीड संसर्गाचा कशा रितीने सामना केला तसंच त्यावेळी कसा अनुभव आला, यावर भाष्य केलं.

लॉकडाऊनच्या काळातील दीड दोन महिने मी जिल्ह्याबाहेर गेलो नव्हतो. जिल्ह्यातील उपाययोजनांकडे मी लक्ष देऊन होतो. मात्र राज्य मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून तसंच महत्त्वाची जबाबदारी म्हणून मला मुंबईला यावं लागलं आणि मुंबईमध्ये मला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यावेळी सर्वांत प्रथम माझी आई माझ्या डोळ्यासमोर आली. कुटुंबियांची खूप काळजी वाटली. मुलींची काळजी वाटली. पण ज्यावेळी घरच्यांना कुणाला संसर्ग झाला नाही हे समोर आलं त्यानंतर मा्त्र मला जरा धीर आला, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, “दवाखान्यात असताना मी मुलींबरोबर व्हीडिओ कॉलवर बोलायचो. मुली मला सांगायच्या, दादा तुम्ही लवकर बरे होणार आहात. काही काळजी करू नका. तुम्ही निश्चिंत रहा… लवकरच तुम्ही कोरोनावर मात करून घरी याल”

तसंच या मुलाखतीत धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे यांनी फोन केल्याची आठवणही आवर्जून सांगितली. ते म्हणाले, “माझ्या आजारपणाच्या काळात पंकजा ताईने फोन केला आणि सदिच्छा दिल्या, याचा आनंद वाटला. आमच्यात संघर्ष झाला होता. कुटुंबात दोन राजकीय विचारधारा आल्या. असं असतानाही बहिणीचा फोन आल्याचा आनंद झाला”

 

-“पडळकरांना भाजपच्या धोकेबाजीचा झटका बसेल तेव्हाच ते शुद्धीवर येतील”

-नागपुरात चक्क 14 वर्षीय मुलानं केली आत्महत्या; कारण वाचाल तर…