“पडळकरांना भाजपच्या धोकेबाजीचा झटका बसेल तेव्हाच ते शुद्धीवर येतील”

मुंबई | शरद पवारांचं वय, अनुभव अन् राजकीय कारकीर्द पाहता पडळकर हे डासाएवढेही नाहीत अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.

पडळकरांना भाजपच्या धोकेबाजीचा झटका बसेल तेव्हाच शुद्धीवर येतील, असं म्हणत गोटेंनी पडळकरांचा जोरदार समाचार घेतला आहे. अनिल गोटे यांनी एक पत्रक जारी केलं असून त्यातून त्यांनी पडळकरांवर निशाणा साधलाय.

पडळकर नव्या नवरीचा आनंद उपभोगत आहे. नवरी रुळल्यावर त्यांना झटके बसतील त्यावेळेला बाजूला स्वत:ची सावलीसुद्धा उभी राहणार नाही. माझ्या अनुभवाच्या जोरावर मी सांगतो आहे, असं गोटे म्हणाले.

पडळकरांचा राजकारणातील अनुभव फारच तोकडा आहे. पडळकरांनी शरद पवारांना कोरोनाची उपमा दिली यावरुन त्यांची राजकीय पात्रता आणि विचारांची पातळी लक्षात येते, अशी टीका गोटेंनी केली आहे.

 

-नागपुरात चक्क 14 वर्षीय मुलानं केली आत्महत्या; कारण वाचाल तर…

-ठाकरे सरकारचा मोठं पाऊल, पोलिसांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय गृहमंत्र्यांनी केला जाहीर