“तुम्ही मंगळावर जरी अडकला असाल तरी भारतीय दुतावास तुमची मदत करेल”

नवी दिल्ली | युद्ध सुरू असलेल्या युक्रेनमध्ये भारतातील अनेक विद्यार्थ्यी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगाची सुरूवाती केली होती.

विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी चार मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रात जाणार आहेत. अशात केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

मंगळावर अडकलात तरी परत आणू, असं म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह हे पोलंडकडे रवाना होणार आहेत. तिथून ते युक्रेनमधल्या भारतीयांना सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

युक्रेनमध्ये अडचणीत असलेला एकही भारतीय नागरिक मागे राहणार नाही. युद्धक्षेत्रात बंधने आहेत, संभ्रम आहेत, सीमांवरही काही अडचणी आहेत. तुमच्याकडे संयम नसेल आणि तुम्ही सूचनांचे पालन केले नाही, तर परिस्थिती बिकट होऊ शकते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

रशियाकडून सातत्याने युक्रेनवर हल्ले सुरु असून तेथे अडकलेल्या भारतीयांना शक्य तेवढ्या लवकर मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच आपल्या नागरिकांना भारतात आणले जाईल, असं आश्वासन केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलंय.

दरम्यान, रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असलेल्या युद्धाला चार दिवस उलटले आहेत. या संघर्षात आतापर्यंत 4,500 युक्रेनी सैन्य मारले गेले असल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर जेलेन्स्की यांनी केला आहे.

तसेच यात युक्रेनचे 150 रणगाडे, 700 सैनिकी वाहनं, 60 फ्युएल टँक आणि 26 हेलिकॉप्टरही नष्ट करण्यात आले आहेत. दरम्यान, हा संघर्ष थांबवण्यासाठी कोणत्याही शर्थीशिवाय बेलारूसच्या सीमेवर भेट घेण्यासाठी दोन्ही देशांचे राष्ट्रपती तयार असल्याची माहिती हाती आली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले, हे सुद्धा देशाला कळायला हवं” 

पुतिन यांचा अमेरिकेला झटका; घेतला हा मोठा निर्णय 

रशिया-यूक्रेन युद्धाचा मोठा फटका; सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला

‘…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये’; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी 

“डॉक्टर हे नालायक, हरामखोर मारखाण्याच्या लायकीचे, त्यांच्याकडे कधी जाऊ नका”