मुंबई | मी या देशाचा पंतप्रधान बनून दाखवणारच, असं वक्तव्य बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी केलं आहे. यामुळे ते पुन्हा चर्चेत आलेत.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तसेच इतर मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत.
उपोषणाला संपूर्ण राज्यभरातून पाठींबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukle) यांनी संभाजी राजेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केलं.
आम्हाला जाणीवपूर्वक चांगले वकील देण्यात येत नाहीत. तसेच तुम्ही समाजाचे तुकडे तुकडे केले. त्यामुळे तुम्ही पंतप्रधान झाले नाही, असं बिचुकलेंनी म्हटलं.
तसेच समजने वाले को इशारा काफी, असंही बिचुकले म्हणाले. फक्त इतकंच नाही तर मागासवर्गीयमधील कोणी मुख्यमंत्री झालं नाही. त्यामुळे मी या देशाचा पंतप्रधान बनून दाखवतो, असं बिचुकले म्हणाले.
संभाजीराजेंच्या रक्तामध्ये शाहूंचे विचार आहे. संपूर्ण देशालाही माहित आहे की मी या ठिकाणी साताऱ्याच्या गादीटा वैचारिक वारसदार आहे, असं ते म्हणालेत.
आजच्या उपोषणाला येण्यासंदर्भात माझी भूमिका अशी की मी संपूर्ण 12 बलुतेदारांना एकत्र घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतो, असं बिचुकलेंनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
“चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले, हे सुद्धा देशाला कळायला हवं”
पुतिन यांचा अमेरिकेला झटका; घेतला हा मोठा निर्णय
रशिया-यूक्रेन युद्धाचा मोठा फटका; सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला
‘…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये’; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी
“डॉक्टर हे नालायक, हरामखोर मारखाण्याच्या लायकीचे, त्यांच्याकडे कधी जाऊ नका”