‘या’ आमदाराने शिवसेनेचं टेंशन वाढवलं; पक्षाच्या बैठकीला दांडी, सभेलाही गैरहजर

मुंबई | राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व आमदारांची सोमवारी शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला तानाजी सावंत उपस्थित नव्हते. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

शिवसेनेच्या आजच्या बैठकीतही तानाजी सावंत कुठेच दिसले नाहीत. स्वत: उद्धव ठाकरे हे यातील काही बैठकांना हजर होते. यामुळे तानाजी सावंत यांची नाराजी कायम असल्याचं दिसतंय. मात्र या नाराजीचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची माहिती समोर आली होती.

शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी तानाजी सावंत यांचं गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये गैरहजर राहण्यामागील कारण सांगितलं आहे.

तानाजी सावंत हे गेल्या दोन-तीन बैठकांमध्ये हजर राहिलेले नाहीत. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होतेय. पण माझ्या माहितीप्रमाणे त्यांना अपघातामुळे इजा असल्याने ते थेट सकाळी मतदानासाठी विधान भवनावर येणार आहेत, अशी माहिती सुनील प्रभू यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या- 

“देश नही झुकने दुंगा विसरलात का?, भाजपच्या मोठाभाईला माफी मांगायला सांगा” 

खळबळजनक! न्यूड व्हिडीओ व्हायरल झालेल्या खासदाराचा घरी सापडला मृतदेह 

“आता माझा नंबर असेल, कारण जो कोणी तुमच्या विरोधात बोलणार त्याला…” 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अतिविराट सभा पाहून टीका करणाऱ्यांची बुबूळं बाहेर आली असतील “ 

राज्यावर अस्मानी संकट; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार