अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्यावर आमदार महेश लांडगे म्हणतात…

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं काल रिलीज झालं. हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. अमृता फडणवींसांना गायनाचा खूप छंद आहे. त्यांनी मोठ्या मोठ्या शोमध्ये गाणं गायलयं. अमृता फडणवीस ह्या पंजाबी अल्बममध्ये देखील झळकल्या आहेत. त्यांचा आवाज या अल्बममध्ये आहेच शिवाय त्या परफॉर्मही करत असतात.

‘सडी गल्ली, रेल गड्डी’ असं अमृता फडणवीस यांच्या या पंजाबी अल्बमचं नाव होत. अमृता फडणवीस यांच्यासोबत या अल्बममध्ये प्रीत हरपाल आणि दीप मोनी या पंजाबी गायकांनी आपला आवाज दिला होता.

‘झी म्यूझिक मराठी’च्या ‘अंधार’ या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटासाठी देखील अमृता फडणवीस यांनी गाणं गायलं होतं. ‘डाव मांडते भीती’, असं गाण्याचं शीर्षक असून व्हिडीओमध्ये गुन्हेगारी थ्रीलर घटना दाखवली होती.

अमृता फडणवीस यांनी आपल्या आवाजासह मनमोहक अदांनी या गाण्याल रेट्रो लूक देण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत त्यांनी ट्विट करत मराठी चित्रपट ‘अंधार‘ मधील जीत गांगुली यांनी संगीतबद्ध केलेले माझे गीत नक्की ऐका, असं देखील म्हटलं होतं

अमृता फडणवीस यांनी याआधी गाण गायलं होते. अलग मेरा ये रंग है, मेरी खुदसेही जंग है, जीत जाऊ ऐ खुदा, अगर तु मेरे संग है, असं या गाण्याचे बोल होते.

‘ये नयन डरे डरे’ असं अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचं नाव आहे. या गाण्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पुण्याचे भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी देखील अमृता फडणवीसांच्या गाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या या गाण्याचा प्रोमो शेअर केला आहे. त्यावर महेश लांडगे यांनी कमेंट केली आहे. ‘व्हॉट अ साँग…. नाईस व्हाइस, असं महेश लांडगे म्हणालेत.

अमृता फडणवीसांच नवीन गाणं समुद्र किनाऱ्यावर चित्रित करण्यात आलं आहे. ये नयन डरे डरे, असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘फँड्री’तील शालू्च्या ‘या’ व्हिडिओने सोशल मिडीयावर घातला धुमाकूळ, पाहा व्हिडिओ

अमृता फडणवीसांचं नवीन गाणं सोशल मिडीयावर घालतंय धुमाकूळ; पहा व्हिडीओ

गॅस सिलेंडर धारकांना आणखी एक झटका! सिलेंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ

अबब… तब्बल 10 हजार रूपयांनी स्वस्त झालं सोनं!

‘….म्हणून तिने आत्मह.त्या केली’; पूजाच्या वडिलांनी सांगितले आत्मह.त्येमागचं ध.क्कादायक कारण