मुंबई : विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली होती. राष्ट्रवादीचे काही आमदार पक्षाची साथ सोडून जात असताना सत्ताधाऱ्यांनी शरद पवार एकटे पडल्याची टीका केली.
आमदारांनी पवारांची साथ सोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यामुळे, त्यावेळी पवारांना सोडून गेलेल्या आमदारांचं काय झालं होतं, हे जाणून घेणं रंजक ठरणार आहे.
सोडून गेलेल्यांविषयी बोलायचं नाही, हे धोरण शरद पवारांनी पाळलं आहे. त्यांचं काय करायचं, ते मी बघतो, असा इशारा पवारांनी एका सभेतून दिला.
काही माणसं गेली, तरी त्याची मला चिंता नाही. 1980 मध्ये 52 आमदार मला सोडून गेले होते, पण पुढच्या निवडणुकीत त्यातला एकही निवडून आला नाही, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.
1980 मधील निवडणुकीमध्ये माझ्या पक्षाचे साठ आमदार निवडून आले होते. त्या वेळी 15 दिवसांसाठी मी परदेशात गेलो असताना काही मंडळींनी सत्तेचं आमिष दाखवून आमदार फोडले होते. मी परत आलो, तेव्हा माझ्याबरोबर केवळ सहा आमदार उरले होते. 1985 मधल्या निवडणुकीत पुन्हा सहाचे साठ आमदार करुन दाखवले होते, असं शरद पवारांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांनी उदयनराजेंविरोधात दंड थोपटले; साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन – https://t.co/QTQuNlUDjO @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019
आचारसंहिता लागू झाली अन् पोलिसांनी 644 जणांना धाडली नोटीस – https://t.co/CxUFpfgMV6 #विधानसभा2019
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019
“तुम्ही महाराष्ट्रासाठी शेवटच्या श्वासापर्यंत तर मी ही तुमच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत!” https://t.co/QUNu9lyxeb @PawarSpeaks @NcpSpeaks12MTI @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019