मुंबई | राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं आहे. यावर्षीचं अधिवेशन चांगलंच वादळी ठरल्याचं पहायला मिळालं.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगितुरा रंगल्याचं पहायला मिळालं.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 300 आमदारांना घरं बांधून देणार, अशी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत असलेले पहायला मिळत आहे.
300 आमदारांना घर देणार असल्याच्या घोषणेवरुन आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काल मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की, आमदारांना घर देऊ, पण मीडियाने असं म्हटलं की, आमदारांना फुकट घरं देणार.
पण मी सांगतो कुणालाही घर मिळणार नाही .ज्यांना मुंबईत घर नाही अशांना घर असं ते होतं. मला आणि माझ्या बायकोला तर घर मिळूच शकत नाही, असं स्पष्टच शब्दांत अजित पवारांनी सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानं सर्वसामान्यांकडून नाराजी जाहीर केली जात आहे. त्याचबरोबर राजकीय वर्तुळातूनही अनेक टीकास्त्र सोडलं जात आहे.
या घोषणेवरून राज्यभरात एकच चर्चा रंगली असून भाजपनेही यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे सध्या राज्यात खळबळ उडालेली पहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“…तोपर्यंत हे महाविकास आघाडी सरकार चालणार”
‘या’ अवयवांवर आक्रमण करतोय कोरोनाचा नवा स्ट्रेन Omicron BA.2, वेळीच व्हा सावध!
‘एसटी कर्मचाऱ्यांनी 31 मार्चपर्यंत ऐकलं नाही तर…’; अजित पवारांचा इशारा
‘RRR’ चिटपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; मोडले मागचे सगळे Records
…तर मला विजय चौकात फाशी द्या- सुप्रिया सुळे