“अमित ठाकरेंची राजकीय वाटचाल आजपासून सुरू होईल”

मुंबई | मनसेचं आज पहिलं राज्यव्यापी अधिवेशन आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सकाळी 10 वाजता या अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं आज राजकीय लाँचिंग होण्याची शक्यता आहे. मनसे नेते संदिप देशपांडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अमित ठाकरेंवर राजकीय जबाबदारी दिली जावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असं संदिप देशपांडे यांनी सांगितलं आहे .

आम्ही आमची इच्छा राज ठाकरेंसमोर व्यक्त केली आहे. पण अंतिम निर्णय राज ठाकरे यांचा असेल, असं संदिप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनाला मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हजर राहणार असल्याची माहिती आहे. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-