मनसेच्या स्टेजवरील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई | मनसेचं आज पहिलं राज्यव्यापी अधिवेशन आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सकाळी 10 वाजता या अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. यावेळी अनेक नव्या गोष्टी पहायला मिळत आहेत.

मनसेच्या स्टेजवर पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो दिसला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

स्टेजवर महापुरूषांच्या फोटोंमध्ये प्रखर हिंदुत्वाचं प्रतिक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा पहिल्यांदाच ठेवण्यात आली आहे. अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, या अधिवेशनात राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं जाणार आहे. मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनाला मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हजर राहणार असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-